पहिला पगार शाळेला.... माजी विद्यार्थीनी पोलीस कॉन्स्टेबल कु. प्रतिक्षा शिर्के यांचा प्रेरणादायी निर्णय | Pratiksha Shirke Baburdi
पहिला पगार शाळेला.... माजी विद्यार्थीनी पोलीस कॉन्स्टेबल कु. प्रतिक्षा शिर्के यांचा प्रेरणादायी निर्णय | Pratiksha Shirke Baburdi
श्रीगोंदा: जि. प. प्रा. शाळा, बाबुर्डी शाळेची माजी विद्यार्थीनी कु. प्रतिक्षा संजय शिर्के (Pratiksha Sanjay Shirke) यांची महाराष्ट्र पोलिसदलात ठाणे पोलिस येथे पोलिस कॉन्स्टेबल या पदावर नेमणूक झाल्याने शाळेच्या व ग्रामस्थांच्या वतीने शाळेत त्यांचा कौतुक सोहळा संपन्न करण्यात आला .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे थोर देणगीदार श्री. कुंडलिक हरिभाऊ शिर्के सर होते.
कु. प्रतिक्षा संजय शिर्के (Pratiksha Sanjay Shirke) यांची महाराष्ट्र पोलिसदलात ठाणे पोलिस येथे पोलिस कॉन्स्टेबल या पदावर नेमणूक
याप्रसंगी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. अध्यक्ष निवड श्री. विजू खामकर सर यांनी केली तर अनुमोदन श्रीम. सुवर्णा मोहोळकर मॅडम यांनी दिले. श्रीम. मंगल पानसरे / शिर्के मॅडम यांनी प्रतिक्षा यांच्या कार्याचा व त्यांनी मिळवलेल्या यशाचा परिचय विद्यार्थी मित्रांना करून दिला. त्यानंतर शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल आहेर ,उपाध्यक्ष श्री. गोरख शिर्के, शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका श्रीम.रोहिणी डोमे मॅडम ,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री .कुंडलिक शिर्के सर , माजी उपसरपंच श्री .छबुतात्या शिर्के यांच्या हस्ते शाल , श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून कु. प्रतिक्षा शिर्के यांचा सन्मान करण्यात आला. कु. प्रतिक्षा यांच्या हस्ते त्या ज्या मातीत कबड्डी खेळायला शिकल्या त्या मैदानाचे पुजन करण्यात आले. सत्काराला उत्तर देताना त्यांनी विद्यार्थ्यांना चिकाटी, मेहनत व अभ्यासाचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी आपले गाव , नातेवाईक व ग्रामस्थ हे सर्व आपल्या यशाचे भागीदार असल्याचे सांगून सर्वांचे आभार मानले. कु. प्रतिक्षा यांनी त्यांच्या पहिल्या पगाराचा रू. ३१००० / - रकमेचा धनादेश वडील श्री. संजय भानुदास शिर्के यांच्या हस्ते शाळा वर्गखोली बांधकामासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विठ्ठल आहेर व मुख्याध्यापिका श्रीम . रोहिणी डोमे मॅडम यांच्याकडे सुपुर्द केला.त्यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. शिर्के सर यांनी आपल्या भाषणातून प्रतिक्षाने मिळवलेल्या यशाबद्दल तिचे व तिच्या परिवाराचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच शाळा वर्गखोली बांधकामासाठी ग्रामस्थांनी स्वतः पुढे येऊन शाळेस बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावा असे आवाहन केले. याप्रसंगी गावातील ग्रामस्थ सर्वश्री. सर्जेराव शिर्के सर , प्रवीण पाटील शिर्के, भास्कर नाना शिर्के, प्रिती रमेश शिर्के, संजय शिर्के आदी मान्यवर उपस्थित होते.. कु. प्रतिक्षाला बाबुर्डी गावच्या सरपंच सौ. संगिता सुभाष उदमले ,उपसरपंच सौ. सरस्वती शहाजी आहेर ,पोलिस पाटील सौ. भारती भगवान शिर्के , सोसायटीचे चेअरमन श्री. काकासाहेब कनक थोरात , व्हा. चेअरमन श्री. बाजीराव बाबूराव चव्हाण तसेच आपल्या तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. सत्यजित मच्छिंद्र साहेब, शिक्षण विस्तार अधिकारी श्री. निळकंठ बोरुडे साहेब, केंद्रप्रमुख श्री. भूकन साहेब आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. तुषार दळवी सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. राजू शिर्के सर व श्री. महेंद्र सुरसे सर यांनी केले.