EduChange Youtube channel
'ज्ञानसेवा तु साफल्यम्'
सर्वांना सप्रेम नमस्कार!
मी श्री. तुषार पं. दळवी पदवीधर प्राथमिक शिक्षक असून गेली १३ वर्षे मी ६ वी ते ८ वीच्या विद्यार्थ्यांना भाषा विषयांचे अध्यापन करत आहे.
Online शिकण्या- शिकवण्याचा मार्ग दाखवला तो कोरोना संकटानं! महाराष्ट्रातील माझ्या विद्यार्थी मित्रांचं शिक्षण थांबू नये एवढ्याच प्रामाणिक उद्देशानं EduChange हे माझं Youtube channel activate केलं. मराठी शाळांतील मुलांना अतिशय दर्जेदार असं इंग्रजी भाषेचं अध्यापन केलं तर निश्चितपणे मराठी मुलांची इंग्रजी भाषेबाबतची भीती तसेच न्यूनगंड सुद्धा दूर होईल व विद्यार्थी मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांत पारंगत होईल असा मला विश्वास आहे.
त्या दृष्टीनेच दर्जेदार शैक्षणिक video निर्मिती करून मुलांना स्वतः अध्यापन करत आहे व त्यातून आनंद मिळवत आहे. परकीय भाषा असल्यानं काही चुका, त्रुटी आढळल्यास जरूर कळवाव्यात. सुचनांचं स्वागतच केलं जाईल. नियमितपणे video पाहण्यासाठी channel Subscrbe तर कराच परंतु bell च्या बटनावर पण click करा.
Channel ला भेट दिल्या बद्दल मनःपूर्वक धन्यवाद!!
Email ID - educhange.tushar@gmail.com